शंतनु
शोधनिबंध लिहिताना एकाहून अधिक लेखक असणे ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे. अनेकवेळा त्या लेखाकांच्या कर्मभूमी/संस्था देखिल वेगवेगळ्या असू शकतात. लाटेक् मध्ये शोधनिबंधाच्या शीर्षकामध्ये ही सर्व माहिती व्यवस्थित देता यावी यासाठी authblk हे package वापरले जाते. त्यात जितके लेखक असतील त्यांच्यापैकी शेवटच्या दोन लेखकांच्या नावाच्या मध्ये 'आणि' हे उभयान्वयी अव्यय येणे अपेक्षित आहे. परंतु पॉलिग्लॉसिया वापरून मराठी निबंध लिहिताना त्यात इंग्रजी 'and' हे अव्यय येते आहे. त्याचे उदाहरण खाली दिले आहे.
-----------------------
![authors_pdf.png](/image?hash=6c096a6003f9c41ba94297a95ce3d837a72ebd68b424377dad9bfbeb23881c2a)
-------------
मूळ आज्ञासंच खालीलप्रमाणे आहे:
```
\documentclass{article}
\usepackage{polyglossia}
\setmainlanguage{marathi}
\setmainfont [Script=Devanagari, Mapping=devanagarinumerals, StylisticSet=1]{Yashomudra}
\usepackage{authblk}
\begin{document}
\author[1]{पहिला लेखक} \author[1]{दुसरा लेखक}
\author[2]{तिसरा लेखक}
\affil[1]{पहिल्या संस्थेचे नाव आणि ठिकाण}
\affil[2]{दुसऱ्या संस्थेचे नाव आणि ठिकाण}
\title{उदाहरण} \date{}
\maketitle
\end{document}
```
ह्यात पुढील आज्ञा लिहिल्यास प्रश्न तात्पुरता सुटतो, परंतु ती आज्ञा मूळ gloss-marathi.ldf मध्ये अंतर्भूत होऊ शकेल काय?
```
\gappto\captionsmarathi{\renewcommand{\Authands}{ आणि }}
```
Top Answer
निरंजन
`gloss-marathi.ldf` मध्ये ७९ व्या ओळीवर पुढील आज्ञा लिहा. (हा बदल करण्याकरिता `gloss-marathi.ldf` ही धारिका administrative privileges सह उघडावी लागेल.)
```
\def\Authands{ आणि }
```
ह्याने हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल अशी आशा आहे. मी गिटहबवरदेखील ही सुधारणा सुचवतो.