निरंजन
अनेक वर्षं लुआ ह्या आज्ञावलीवर आधारलेला लुआ-लाटेक् हा अत्याधुनिक चालक देवनागरी लिपी (व इतर काही भारतीय लिप्या) योग्य प्रदर्शित करत नव्हता. २०२० च्या टेक्-लाईव्ह वितरणामध्ये `हर्फ़बझ` (उर्दूत हर्फ़ म्हणजे अक्षर, त्यामुळे त्याचा उच्चार हार्फ असा करणे टाळावे.) हा लुआ-अंतर्गत चालक विकसित करून त्याच्या साहाय्याने भारतीय लिप्यांना योग्य दाखवण्यासाठी सर्व सोयी करण्यात आल्या आहेत. पुढील उदाहरण २०२० मधील टेक्-वितरणासह लुआ-लाटेक्-मध्येू चालवून पाहा.
```
\documentclass[12pt]{book}
\usepackage{polyglossia}
\setdefaultlanguage{marathi}
\setmainfont[Renderer=Harfbuzz, Script=Devanagari, Mapping=devanagarinumerals]{Shobhika}
\begin{document}
नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत. नमस्कार हा देवनागरीत लिहिलेला मराठी मजकूर आहे. ह्यातील सर्व अक्षरे व्यवस्थित दिसत आहेत.
\end{document}
```
आता आपण लुआ-लाटेक्-मधील सोयीसुविधा शिकून घ्यायला हव्यात. क्सेलाटेक्-मध्ये जमू शकत नाहीत अशा अनेक गोष्टी लुआ-लाटेक्-ने जमवता येऊ शकतात.
शुभेच्छा! :)