सुशान्त
ही एक वेगळी चर्चामालिका सुरू करत आहे. ह्यात
१. लाटेक्-विषयीचे मराठी लेखन : लाटेक्-विषयी मराठीतून कुणी माहितीपर लेखन केले असेल आणि ते महाजालावर वा अन्यत्र उपलब्ध असेल तर त्याची माहिती नोंदवावी. हे लेखन महाजालावर उपलब्ध असेल तर त्याचा दुवाही इथे नोंदवावा.
२. लाटेक्-वापरून मराठी मजकुराची अक्षरजुळणी : लाटेक् वापरून मराठी मजकूर जुळवून कुणी पुस्तके, दस्तऐवज इ. तयार केले असतील तर त्यांची माहिती इथे नोंदवावी. इथेही ही सामग्री महाजालावर उपलब्ध असेल तर त्याचा दुवा नोंदवावा.
ह्याचा उपयोग असा होईल की आपल्याला लाटेक् वापरून अक्षरजुळणी केलेले मराठीतील नमुने एकत्र पाहायला मिळू शकतील.
मला माहीत असलेल्या दोन प्रयत्नांची माहिती इथे प्रारंभी नोंदवत आहे.
१. लाटेक् ही आज्ञावली मराठी व अन्य भारतीय भाषांसाठी कशी वापरावी ह्याविषयी एक माहितीपुस्तिका डॉ. रोहित होळकर ह्यांनी लिहिली आहे. ती पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.
https://www.ctan.org/pkg/latex-mr
२. लाटेक् वापरून मराठीत अक्षरजुळणी केलेली काही पुस्तके पुढील दुव्यावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
https://sites.google.com/site/latexmrbooks/
Top Answer
Anonymous 1627
टेक्-लाइव्हच्या नव्या आवृत्तीत [मराठी](https://ctan.org/pkg/marathi) नावाचा आज्ञासंच (पॅकेज) उपलब्ध झालेला आहे. ते वापरून आता लाटेक्-मध्ये मराठीचा वापर आता अगदी सहज करता येतो. त्याची माहितीपुस्तिकाही मराठीतच केलेली आहे.
http://mirror.iopb.res.in/tex-archive/language/marathi/marathi.pdf
आज्ञावलीची सर्व सामग्री खालील गिटलॅबवरच्या संग्राहिकेत उपलब्ध आहे.
https://gitlab.com/niruvt/marathi/
इथे टॉपआन्सर्स टेक्-मराठी ह्या गटावर ह्या आज्ञासंचाची माहिती आज्ञासंचाच्या निर्मात्यानेच म्हणजे निरंजननेच पुरवलेली आहे.
https://topanswers.xyz/tex-mar-deva?q=1070