add tag
sayali
https://topanswers.xyz/tex-mar-deva?q=870 

वरील दुव्यामधील नोंदीत लाटेक् मध्ये देवनागरी मजकूर कसा दिसेल ह्याची माहिती आली आहे.
पण त्यात अधिकचा मराठी मजकूर भरायचा झाल्यास,

```
\documentclass{article}
\usepackage{fontspec}
\setmainfont[Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{Shobhika}

\begin{document}
\title{मराठी लाटेक्}
\author{सायली}
\date{\today}
\maketitle

%लेखाचा मजकूर  
  सदर माहिती मराठी लाटेक् वापरण्याविषयी आहे.
    
\end{document}


```

हा कोड क्सेलाटेक् मध्ये चालवल्यानंतर वर दिलेली माहिती देवनागरीत उमटते. मात्र महिना रोमन लिपीतच दिसतो.

फॉण्टस्पेकऐवजी पॉलिग्लॉसिया वापरल्याने, 
```
\documentclass{article}
\usepackage{polyglossia}
\setdefaultlanguage{marathi}
\setmainfont[Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{Shobhika}

\begin{document}
\title{मराठी लाटेक्}
\author{सायली}
\date{\today}
\maketitle

%लेखाचा मजकूर  
  
  सदर माहिती मराठी लाटेक् वापरण्याविषयी आहे.
    
\end{document}

```
दिलेल्या माहितीनुसार मजकूर पूर्णपणे देवनागरीत दिसतो. 

पॉलिग्लॉसिया हे पॅकेज बहुभाषिक वापरासाठी असल्याने त्यात `\setdefaultlanguage` ही आज्ञा वापरून नेमकी भाषा त्यानुसार निश्चित करणेही गरजेचे आहे. 

Enter question or answer id or url (and optionally further answer ids/urls from the same question) from

Separate each id/url with a space. No need to list your own answers; they will be imported automatically.