लेख
add tag
निरंजन
**प्रश्न** -

लाटेक्-मध्ये देवनागरीतून मजकूर लिहिल्यास पुढील अडचणी येतात. उदाहरणादाखल पुढील कोड पाहा.

```
\documentclass{article}

\begin{document}
	नमस्कार
\end{document}
```

`पीडीएफ्-लाटेक्` वापरून हे चालवल्यास पुढील अडचण दाखवली जाते.

```
Package inputenc Error: Unicode character न (U+0928)(inputenc) not set up for use with LaTeX. न
```
ही अडचण कशी सोडवावी?

**उत्तर** -

ह्याकरिता `फॉन्टस्पेक` नावाचा आज्ञासंच उपयुक्त आहे. ह्या आज्ञासंचासह आपण आपल्या आवडीचा टंक निवडू शकतो व त्या टंकामध्ये सर्व मजकूर दिसू शकतो. वरील उदाहरणाची सुधारित आवृत्ती पाहा -

```
\documentclass{article}
\usepackage{fontspec}
\setmainfont{Shobhika}

\begin{document}
	नमस्कार
\end{document}
```

केवळ देवनागरी टंक निवडल्याने जोडाक्षरं नीट दिसत नाहीत, शिवाय लाटेक् पृष्ठक्रमांक आपोआप देते. तिथेदेखील देवनागरी आकडे दिसत नाहीत. त्याकरिता टंकासोबत पुढील दोन प्राचलं (parameter) निवडावीत.

```
\documentclass{article}
\usepackage{fontspec}
\setmainfont[Script=Devanagari,Mapping=devanagarinumerals]{Shobhika}

\begin{document}
	नमस्कार
\end{document}
```

**महत्त्वाचे - `फॉन्टस्पेक` आज्ञासंच वापरल्यावर मजकूर `क्सेलाटेक्`सह चालवावा.**

Enter question or answer id or url (and optionally further answer ids/urls from the same question) from

Separate each id/url with a space. No need to list your own answers; they will be imported automatically.