आपल्याकडे टेक्-लाइव्हचं एप्रिल २०२०चं वितरण असेल आणि त्यातील काही आज्ञासंच अद्ययावत होत आहेत हे आपल्याला लक्षात आलं. तर तो विशिष्ट आज्ञासंच आपल्या संगणकावर वापरता येण्याजोगा कसा करावा? उदा. बिबलाटेक् ह्या आज्ञावलीत मराठीशी संबंधित काही बदल होत आहेत. मला हे बदल माझ्या संगणकावर उपलब्ध करून घ्यायचे असल्यास काय करता येईल?