आपल्याकडे टेक्-लाइव्हचे एखादे वितरण असेल उदा. एप्रिल २०२०चे, तर त्यात विविध आज्ञावल्या असू शकतात. ह्या आज्ञावल्याही अद्ययावत होत असतात. पण आपण जोवर टेक्-लाइव्हचे नवे अद्ययावत वितरण उदा. एप्रिल २०२१ उतरवून घेत नाही किंवा ते जोवर उपलब्ध होत नाही तोवर आपल्याला अद्ययावत झालेल्या आज्ञावल्यांचा वापर करता येत नाही. ह्यावर काही उपाय आहे का? म्हणजे आपल्याला आपल्याकडच्या टेक्-लाइव्हच्या वितरणानंतर अद्ययावत करण्यात आलेले आज्ञासंच अद्ययावत करून कसे घेता येतील?