add tag
Sushant
[मराठी](https://ctan.org/pkg/marathi) हा आज्ञासंच वापरून धारिका तयार करताना त्यात इंग्लिश मजकूर लॅटिन लिपीत लिहायचा असेल तर काय करता येईल?
नमुना आज्ञावली खाली दिली आहे.

```
\documentclass{article}

\usepackage{marathi}

\begin{document}

    \नमुना
    
    English 12345
    
\end{document}
```
Top Answer
निरंजन
मराठी आज्ञासंचातर्फे शोभिका हा टंक मूलटंक म्हणून निवडला जातो. ह्या टंकात लॅटिन अक्षरांचा समावेश आहे, त्यामुळे लॅटिन लिपीतील अक्षरे दिसण्यास कोणतीही अडचण नाही, परंतु `babel` आज्ञासंचातील `\babelprovide` ह्या आज्ञेकरिता वापरलेले `mapdigits` हे प्राचल लुआलाटेक्-सह लॅटिन अंकांचे देवनागरी अंकांत रूपांतरण करते, तसेच `polyglossia` आज्ञासंच वापरत असल्यास `Mapping=devanagarinumerals` हे प्राचलदेखील तेच काम करते. त्यामुळे साध्या मजकुरात लिहिलेले लॅटिन अंक फलितात दिसत नाहीत, परंतु आकडे `$1,2,3$` अथवा `\(1,2,3\)` अशा प्रकारे गणित-क्षेत्रात लिहिले, तर ते व्यवस्थित दिसतात. तसेच लाटेक्-चा मूलटंक (लॅटिन मॉडर्न) वापरावयाचा असेल, तर `\fontfamily{lmr}\selectfont` ह्या फॉन्टस्पेक आज्ञासंचापूर्वीपासून लाटेक्-मध्ये असणाऱ्या आज्ञा वापरता येऊ शकतात. नमुना आज्ञावली पुढे पाहा.

```
\documentclass{article}
\usepackage{marathi}
\DeclareTextFontCommand{\latintext}{\fontfamily{lmr}\selectfont}

\begin{document}
मराठी मजकुरात देवनागरी आकडे १,२,३ व लॅटिन आकडे \(1,2,3\).

Latin text in Shobhika font with Latin numerals $1,2,3,4,5$.

{%
  \fontfamily{lmr}\selectfont
  Latin text in default \LaTeX\ font. (i.e.~Latin Modern)
}%

\latintext{Latin text in default \LaTeX\ font. (i.e.~Latin Modern)}
\end{document}
```

Enter question or answer id or url (and optionally further answer ids/urls from the same question) from

Separate each id/url with a space. No need to list your own answers; they will be imported automatically.