निरंजन
लाटेक्-वर मराठी लिहिण्यासाठी ज्या अनेक आज्ञा समाविष्ट कराव्या लागतात, त्या लिहाव्या न लागता, केवळ एक आज्ञासंच निवडून ही कामं करता यावीत ह्याकरिता [`marathi`](https://ctan.org/pkg/marathi) हा आज्ञासंच CTAN वर प्रकाशित झाला आहे. ह्या आज्ञासंचाची [पुस्तिका](http://ctan.math.washington.edu/tex-archive/language/marathi/marathi.pdf) मराठीत आहे. डॉक्स्ट्रिप ह्या प्रगत आज्ञावलीचा वापर करून तयार करण्यात आलेली ही पहिली मराठी पुस्तिका आहे. ही लाटेक्-वरची दुसरी मराठी हस्तपुस्तिका आहे. (पहिली रोहित होळकरांची लाटेक्-च्या सर्वसाधारण वापराविषयी व पॉलिग्लॉसिया आज्ञासंचावरची. ती [इथे](https://ctan.org/pkg/latex-mr) इथे पाहता येईल.) `blindtext` ह्या आज्ञासंचाप्रमाणे मराठीतून नमुना मजकूर तयार करण्याची सुविधादेखील ह्या आज्ञासंचात अंतर्भूत आहे. `article`, `letter`, `beamer`, `report`, `book` ह्या सर्व लाटेक्-वर्गांचे नमुने ह्या आज्ञासंचासह तयार करता येतात. पुढील उदाहरणासह हे स्पष्ट होऊ शकेल. ह्या आज्ञासंचाबाबत कोणतेही प्रश्न अथवा सुधारणा असतील तर त्या [गिटलॅबच्या पानावर](https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi) सुचवता येतील. पुढील उदाहरण झी-लाटेक् अथवा लुआ-लाटेक्-चा वापर करून चालवून पाहा.
```
\documentclass{article}
\usepackage{marathi}
\begin{document}
\नमुना
\end{document}
```